Wednesday, March 18, 2009

मी का म्हणुन मतदान करु?

माझ्या आईच्या भाषेत मी आता २४ वर्षांचा घोडा झालो असलो तरी माझे अजून मतदार यादीत नाव नाहीये. I know, I know....ही काही अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाहीये. याला माझा आळस म्हणा किंवा apathy. सध्या Jaago Re वाले बरीच ’जनजाग्रुती’ करत आहे्त; तेंव्हा मला पण जरा चेव चढला. म्हटले की यादीत नाव नोंदवण्याआधी कोण उमेदवार आहेत ते तरी बघावं. पण त्यांची नावं बघून मात्र माझा पूर्ण भ्रमनिरास झाला :(

Congress चे जे उमेदवार महाशय आहेत ते याच मतदा्रसंघातून ५ वेळा निवडुन आले आहेत. असे असूनही त्यांनी या भागासाठी काय कामे केली बुवा असे कोणी विचारले तर मोजून ५ ही सांगता येणे अवघड आहे! BJP कडून जे उभे आहेत त्यांची ही पहिलीच निवडणुक आहे. मागच्या काही महिन्यांतले त्यांचे फालतू publicity stunt बघून मला वाटलेच होते की हे सगळं निवडणुकीसाठीच असणार!

या दोघांमधलं कोणीही निवडून या्वं अशी माझी अजिबात इच्छा नाहीये! मग मी मतदान करण्य़ाला काय अर्थ आहे?

Monday, March 2, 2009

It's not unpatriotic to love Slumdog Millionaire!!! Yes, I liked the movie and I am an Indian.