माझ्या आईच्या भाषेत मी आता २४ वर्षांचा घोडा झालो असलो तरी माझे अजून मतदार यादीत नाव नाहीये. I know, I know....ही काही अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाहीये. याला माझा आळस म्हणा किंवा apathy. सध्या Jaago Re वाले बरीच ’जनजाग्रुती’ करत आहे्त; तेंव्हा मला पण जरा चेव चढला. म्हटले की यादीत नाव नोंदवण्याआधी कोण उमेदवार आहेत ते तरी बघावं. पण त्यांची नावं बघून मात्र माझा पूर्ण भ्रमनिरास झाला :(
Congress चे जे उमेदवार महाशय आहेत ते याच मतदा्रसंघातून ५ वेळा निवडुन आले आहेत. असे असूनही त्यांनी या भागासाठी काय कामे केली बुवा असे कोणी विचारले तर मोजून ५ ही सांगता येणे अवघड आहे! BJP कडून जे उभे आहेत त्यांची ही पहिलीच निवडणुक आहे. मागच्या काही महिन्यांतले त्यांचे फालतू publicity stunt बघून मला वाटलेच होते की हे सगळं निवडणुकीसाठीच असणार!
या दोघांमधलं कोणीही निवडून या्वं अशी माझी अजिबात इच्छा नाहीये! मग मी मतदान करण्य़ाला काय अर्थ आहे?
4 comments:
http://siddhya.blogspot.com/2009/03/i-dont-think-he-will-win.html
i m not saying each constituency got that gr8 contestant but we must search / encourage that kind people at least ...
Hmm...right. I have decided to vote at least for the party I want see in power.
आपण मत दिलं नाही तरीही कुणीतरी निवडून येणारच आहे ना. आपण कितीही अलिप्त रहायचा प्रयत्न केला तरी हे उमेदवार त्यांच्या विरोधी पक्षाला तरी answerable असतातच. तेंव्हा, दोघंही कितीही नालायक असले तरी, त्यांचा नेमका अजेन्डा काय आहे, तो realistic आहे की उगाच आश्वासनांची खैरात वाटतायत ह्या वर आपण थोडा तरी विचार करायला हवा.फक्त सर्वांना दोष देण्यापेक्षा, ही जी मंडळी निवडणूकीसाठी उभारली आहेत, त्यांच म्हणणं कितीही निरर्थक वाटलं तरी ऐकून घ्यायचं, त्यावर विचार करून त्यांना प्रश्न विचारायचे आणि मग मत द्यायचं, असं मला वाटतं.
प्रत्येक निवडणूकीनंतर ५ वर्षांत आपण एकूण मिळून (’ह्या देशाचं काही खरं नाही’ वाली कधीतरी निघणारी चर्चा) १ तास तरी ह्यांच्या नावनं खडे फोडतोच ना. मग तोच एक तास निवडणूकीच्या आधी देउन, सद्सद्विवेकबुद्धीने analysis करून मत द्यायला हरकत नाही.
निकाल जो लागायचाय तो लागो. अर्थात हे माझं वैयक्तिक मत. काय म्हणतोस?
Tu aata mala he sagale sangun upayog nahi, last date nighun geleli aahe :P
Pudhachya election la nakki!! :D
Post a Comment